AO3 News

Post Header

Published:
2022-06-05 00:16:56 UTC
Original:
Comment blocking is coming
Tags:

आम्हाला जाहीर करताना आनंद होत आहे की पुढील काही दिवसांमध्ये आम्ही आमच्या अवरोधन आणि निशःब्द करण्याच्या वैशिष्ट्यांचा पहिला भाग उघड करत आहोत: विशिष्ट लॅाग्ड इन वापरकर्त्यांना आपल्या कार्यांवर टिप्पणी करण्यापासून व आपल्या टिप्पणी वर प्रत्युत्तर देण्यापासून अवरोधित करण्याची क्षमता.

अवरोधन व निशःब्द करणे: एक पुनरावलोकन

लोकांना Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर मजकुर निर्माण करणे व संवाद करणे अवघड न बनवता, वापरकर्त्यांना आपला अनुभव निर्देशित करण्यासाठी व छळवणुकीपासून संरक्षणाची एक भिंत घालण्यासाठी आम्ही वैशिष्ट्यांच्या दोन संचांची अंमलबजावणी करणार आहोतः

  • अवरोधन, ज्यामुळे काही वापरकर्त्यांना आपल्याशी संवाद साधण्यापासून रोखता येईल.
  • निःशब्द करणे, ज्यामुळे काही वापरकर्त्यांचा मजकुर आपल्या वैयक्तिक AO3 अनुभवातून वगळता येईल.

एकाच वेळी या संकल्पना AO3 च्या अगणित आणि खूपदा एकमेकांशी जोडलेल्या वैशिष्ट्यांवर लागू करणे मोठे काम आहे व म्हणूनच आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत ज्यामुळे आपल्याला वापरकर्त्यांना काही क्षेत्रांमध्ये अवरोधित आणि निःशब्द करता येईल आणि त्यादरम्यान इतर क्षेत्रांत आम्ही त्यावर काम करत राहू.

अवरोधन भाग १: टिप्पण्या

अवरोधित वापरकर्ते पृष्ठ अवरोधन नक्की काय असते ह्याचे वर्णन करते आणि एका छोट्या फॉर्म च्या द्वारे तुम्हाला आणखी वापरकर्त्यांना अवरोधित करू देते.  हे पृष्ठ आपल्याला अवरोधित केलेल्या वापरकर्त्यांची यादी हि दाखवते आणि त्यांना अअवरोधित करण्याचा पर्यायसुद्धा देते.

ह्या पहिल्या प्रदर्शनानंतर, आम्ही लॉग्ड इन वापरकर्त्यांच्या टिप्पण्या अवरोधित करणे यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. आपण जेव्हा एका वापरकर्त्याला अवरोधित करता, तेव्हा ते आपल्या कार्यांवर टिप्पणी देऊ शकणार नाहीत अथवा आपण बातमी पोस्ट्सवर किंवा इतर निर्मात्यांच्या कार्यांवर केलेल्या टिप्पण्यांवर प्रत्युत्तरही देऊ शकणार नाहीत. त्यांनी आत्तापर्यंत आपल्यासाठी केलेल्या टिप्पण्या व प्रत्युत्तरांमध्ये ते बदलही करू शकणार नाहीत.

अवरोधित केलेल्या वापरकर्त्याने त्यांचे नाव बदलले तरीही हे अवरोधन कायम राहील.

त्यांच्या रेखाचित्र, दर्शनीफळा, किंवा टिप्पण्यांवर असलेले "Block" (अवरोधन) बटण दाबून, आपण एखाद्या वापरकर्त्याला अवरोधित करू शकता. ज्या वापरकर्त्यांना तुम्ही आधी अवरोधित केले असेल त्यांना अअवरोधित सुद्धा ह्याच ठिकाणांहून करता येईल.

आपण नवीन अवरोधित वापरकर्ते पृष्ठावर त्यांचे नाव घालूनही एखाद्या वापरकर्त्याला अवरोधित करू शकता, जे आपल्या प्राधान्ये पृष्ठावरील "Blocked Users" (अवरोधित वापरकर्ते) दूवा वापरून आपण बघू शकता.

अवरोधित वापरकर्ते पृष्ठावर आपण अवरोधन केलेल्या सर्व वापरकर्त्यांची यादी दिसेल. आपण कोणाला अवरोधित केले आहे हे इतर वापरकर्ते बघू शकणार नाहीत – आपल्या अवरोधित वापरकर्त्यांची यादी फक्त आपल्याला आणि काही स्तराच्या साईट व्यवस्थापकांनाच फक्त बघण्यास उपलब्ध असेल.

AO3 वर इतर कुठे आपण अवरोधित केलेले कोणी आपल्या कार्यांवर टिप्पणी किंवा अपल्या टिप्पण्यांवर प्रत्युत्तर करत आहे असा तुम्हाला संशय असेल तर नियम आणि तक्रारनिवारण समितीशी संपर्क करा.

कृपया ह्याची नोंद असू द्या की आपण जर अश्या वापरकर्त्यांना अवरोधित केले असेल ज्यांच्याबरोबर आपण कार्य सह-निर्मित केले आहे, तर त्यांना आपण सह-निर्मित केलेल्या कार्यावर तरीसुद्धा टिप्पणी करू शकेल. परंतु, त्या कार्यावर आपण केलेल्या टिप्पणीवर ते थेट प्रत्युत्तर देऊ शकणार नाहीत.

निःशब्द करणे: एक अद्यतनीकरण

लॉग्ड इन वापरकर्त्यांना निःशब्द करणे यासाठीही आम्ही समान इंटरफेस वर कार्य करीत आहोत, पण त्यादरम्यान, आपण वापरकर्ते, कार्य, मालिका, किंवा बाह्य कार्य यांना निःशब्द करू शकता, साईट पृष्ठरचना निर्माण करून व पुढील CSS वापरूनः

  • .user-000 { display: none !important; } ज्यामुळे एखाद्या वापरकर्त्याची कार्य, मालिका, आणि वाचनखुणा, त्याचबरोबर, त्या वापरकर्त्याने लॅाग्ड इन असताना कार्यांवर किंवा बातमी पोस्टस वर केलेल्या टिप्पण्या ह्या कार्य व वाचनखुणांच्या यादीतून आणि शोध निकालांमधून लपविल्या जातील. 000 च्या जागी आपण ज्यांचे कार्य अवरोधित करू इच्छिता त्या वापरकर्त्याचे आयडी घाला. वापरकर्त्याचा आयडी म्हणजे आकड्यांची मालिका असते जी वापरकर्त्याच्या रेखाचित्रात "माझा वापरकर्ता आयडी" या क्षेत्राअंतर्गत सापडू शकेल. वापरकर्त्याने त्यांचे नाव बदलले तरीही वापरकर्ता आयडी बदलत नाही.
  • .work-000 { display: none !important; } वाचनखूण व शोध परिणाम यादीतून विशिष्ट कार्य लपवण्यासाठी हे वापरा. 000 च्या जागी आपण जे कार्य अवरोधित करू इच्छिता त्याचा आयडी घाला. कार्य आयडी ही एक आकड्यांची मालिका असते जी कार्याच्या URL मध्ये सापडू शकते. /works/ या नंतर लगेच आयडी असतो, उदा. https://archiveofourown.org/works/000/chapters/123.
  • .series-000 { display: none !important; } वाचनखूण आणि शोध परिणामांतून तसेच वापरकर्त्याच्या मालिका पृष्ठांतून विशिष्ट मालिका लपवण्यासाठी. 000 च्या जागी आपण जी मालिका अवरोधित करू इच्छिता त्याचा आयडी घाला. मालिका आयडी ही एक आकड्यांची मालिका असते जी मालिकेच्या URL मध्ये सापडू शकते. /series/ या नंतर लगेच मालिका आयडी असतो, उदा. https://archiveofourown.org/series/000.
  • .external-work-000 { display: none !important; } वाचनखूण आणि शोध परिणामांमधून विशिष्ट बाह्य कार्य लपविण्यासाठी. 000 च्या जागी आपण जे बाह्य कार्य अवरोधित करू इच्छिता त्याचा आयडी घाला. (संदर्भित बाह्य कार्याच्या अनेक प्रति आणि त्यांचे वेगवेगळे आयडी असू शकतात याची नोंद असू द्या). बाह्य कार्य आयडी ही एक आकड्यांची मालिका असते जी मालिकेच्या URL मध्ये सापडू शकते. /external_work/ या नंतर लगेच आयडी असतो, उदा. https://archiveofourown.org/external_work/000.

अनेक बाबी लपविण्यासाठी, आपण निवडक स्वल्पविरामांनी वेगवेगळे करू शकता: .work-000, .work-149319, .user-000 { display: none !important; }

इतर पर्याय

येत्या अवरोधन आणि निशब्ध करण्याच्या वैशिष्ट्यांच्या बरोबर, सध्यस्थितीत असे अनेक पर्याय आहेत ज्यांनी आपण आपला AO3 अनुभव नियंत्रित करू शकता.

आमच्या अनधिकृत ब्राऊसर साधने वाविप्र यादी मध्ये तृतीय-पक्ष स्क्रिप्ट्स आहेत ज्या नको असलेला मजकूर आपल्याला चाळू देतात, आणि विविध वैशिष्ट्य व्यवस्थापित करण्यासाठी हे काही सध्यस्थित पर्याय आहेत:

आम्ही नेहमीच अश्या अनेक पर्यायांवर काम करीत असतो, व म्हणूनच नियमित परत तपासणी करीत राहा – इथे AO3 बातम्यांमध्ये आम्ही अधिकतम बदल करण्याआधी घोषित करीत असतो. अद्ययावत राहण्यासाठी आपण @AO3_ट्विटर स्टेटस किंवा टंब्लर वर ao3org वर आम्हाला फोलो करू शकता.